Monday, February 9, 2026

गुरुक्षेत्रम् मधले बापू

गुरुक्षेत्रम् मध्ये रोज दुपारी बापु येऊन पूजन करायचे , त्या वेळी काय सूंदर वातावरण असायचे. मी free असल्याने आठवडयातुन जास्तीत जास्त वेळा जाण्यासाठी प्रयास करायचो  आणि तिथे बापू येण्याआधीच धर्मासनासमोरची जागा पकडून बसायचो . ते क्षण फार सूंदर होते . साक्षात देव समोर बसायचा . आणि त्याकडे पाहत पाहत आम्ही सर्व पठण व आरती करायचो . बापु बहुदा डोळे बंद करून बसत , पण जेव्हा डोळे उघडायचे तेव्हा भरभरुन सर्वाना पहायचे .
  बापूंच्या अगदी पुढयात बसलेल्या मला , बापुनी डोळे उघडून आधी मला पहावे  अशी वेडी इच्छा करतसे . आणि खरच माझ्या मनातले भाव त्या सावळ्या पासुन काय लपणार ? तो इच्छा पूर्ण करायचा .
I love u dad

Thursday, May 19, 2016

पहिला अनुभव

शाळेत जात होतो . भर दुपार ची वेळ  . चालता चालता अचानक माझ्या पोटात दुखायला लागले . त्या वेळी मी नुकताच बापूंकडे जाऊ लागलो होतो . मी मनातल्या मनात बापूना म्हणालो , " मला तुमचा जप पण माहित नाही , पण मी फ़क्त ॐ अनिरुद्ध नमः बोलतो , माजी पोटदुखी बरी करा "

   काय राव , हा नटखट अनिरुद्ध , बरा ज़ालो लगेच् .

Wednesday, May 18, 2016

चालतोचि आहे सोबतीने

नेहमी ऑफिस च्या पायरी चढ़ताना थकवा जाणवायचा , आज नकळत अनिरुद्ध अनिरुद्ध चा जप श्वासाच्या गतीने सुरु जहाला , शेवटच्या पायरिवर आलो तेव्हा जाणीव ज़हालि की जरा ही न थकता वर येऊन पोचलो .
  आणि बाप्पाचे शब्द आठवले , माझे नाव घेणार्याचे अर्धे कष्ट मी घेतो .
  उर भरून आला माजा

अम्बदन्य

Tuesday, January 12, 2016

" संकट BYPASS "

" संकट BYPASS "

हरी ओम

 माझा बापुराया हा सर्व संकटापेक्षा मोठा आहेच . त्याच्या बाळांवर येणारे प्रत्येक संकट तो हलकेच दूर करतो . स्वतः नामानिराळा राहणारा हा बापूराया कोणत्याही संकटाचा झाडा करतो आणि  त्याच्या बाळांवर प्रेमाची छाया धरतो . बापूंच्या सहवासाचा अनुभव येथे मी मांडत आहे ; कि त्याने किती सहजगत्या आमच्या घरावर  आलेले संकट दूर सारले .
    १९ डिसेम्बर चा दिवस श्री सत्चिदानंद उत्सवासाठी बापु ( श्रींच्या पादुका ) घरी आले . पहिले दोन दिवस सोहळा छान पार पडला . तिसऱ्या दिवशी म्हणजेच २१ डिसेम्बर ची ही गोष्ट ! माझे वडील एकनाथसिंह गुरव यांना सकाळी उठल्यापासूनच अस्वस्थ वाटत होते . पोटात अपचन आणि छाती भरल्यासारखी त्यांना वाटत होती . रोज सकाळी ८:३० ला ते कामाला ठाण्यावरून उरण ला जातात . गेले काही महिने DRIVER नसल्याने त्यादिवशीही त्यांनाच DRIVE करावे लागणार होते . बापूंना पाया पडून तशाच अवस्थेत ते कामावर जाण्यास निघाले . त्यांनी विचार केला कि वर्तक नगर नाक्यावर DISPENSARY मध्ये जाऊन औषध घ्यावे . अशा प्रकारे घरात कोणालाही अतिरिक्त होणाऱ्या त्रासाबद्दल न सांगता ते घरातून निघाले . आम्ही घरातील सर्व सकाळच्या पूजनाची तयारी करत होतो .
   वडील घरातून निघाल्यानंतर साधारणत : २५ ते ३० मिनिटांनी मला त्यांचा CALL आला ; म्हणाले कि "राहुल , जरा श्रोत्री डॉक्टर कडे ये ." इतकच बोलून त्यांनी   PHONE  ठेवला . त्यांच्या आवाजातील बदल मला जाणवला होता , म्हणून घरातील इतरांना काहीही न सांगता आधी परिस्थिती पाहून यावी म्हणून मी लगेच BIKE  वरून डॉक्टर कडे गेलो . तिथे पहिले तर वडीलांचा SHIRT उलटी ने खराब झाला होता . आणि ते शांत बसले होते . डॉक्टर ने मला जवळ बोलावून सांगितले कि , " तुझ्या वडिलांची तब्येत खराब आहे  . त्यांना इथे जेव्हा मी CHECK  करत होतो , तेव्हा त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले आणि त्यांना बेशुद्धावस्थेतच उलटीही झाली .  ताबडतोब जाऊन ECG  काढून ये . "
  मी ताबडतोब वडिलांना घेऊन जवळच्या हॉस्पिटल मध्ये  ECG  काढला , तिथल्या DOCTOR ने  ECG  मध्ये CHANGES  असल्याचे सांगितले . पण "  विशेष काही त्रास जाणवला तर या " असे सांगून वडिलांना गोळ्या लिहून  दिल्या . त्यानंतर मी वडिलांना घेऊन घरी आलो . घरी नुकतीच पूजा चालू होणार होती .  आई ला आणि लहान भावाला झालेल्या प्रकारची माहिती देताच सर्वानुमते JUPITAR  हॉस्पिटल ला एकदा दाखवून यावे असे ठरले . आम्ही सर्वांनी मिळून सकाळची पूजा केली . घरातून निघण्यापूर्वी सर्वांनी एकत्र शुभंकरा आणि अशुभनाशिनी स्तोत्र म्हंटले , वडिलांनी बापूंना साष्टांग नमस्कारही केला आणि मगच आम्ही निघालो .
  JUPITAR  हॉस्पिटल ला येऊन CHECK केले असता , हि तर EMERGENCY CASE आहे असे बोलून DIRECT वडिलांना I .C.U . मध्येच शिफ्ट केले .
क्षणभर खरच काहीच कळत नव्हते कारण सर्व काही इतक्या लवकर घडत होते कि काही समजायला भाग नाही . डॉक्टरने मला ICU च्या PROCEDURE करण्यास सांगितले , मी जाऊन येईस्तोवर  माझ्या वडिलांना ICU  मध्ये शिफ्ट करून झाले सुद्धा !! २४ तासांचे injection दिले , आणि ANGEOGRAPHY  करणार असल्याचे आम्हाला सांगितले गेले . आम्ही दादांना सांगावे म्हणून डॉक्टर पडेलकर यांना फोन करून सर्व माहिती दिली , त्यांनी ती दादांच्या कानावर घातली .
  दुसऱ्या दिवशी वडिलांचा REPORT आला , पण REPORT ABNORMAL होता . ५ ठिकाणी BLOCKAGES  असल्याने तिथे ANGEOPLASTY शक्य नव्हती , तिथे BYPAAS  हाच OPTION आहे असे समजले  . HEART BYPAAS हा शब्द फक्त ऐकण्यांत होता , परंतु तो प्रत्यक्ष माझ्या वडिलांवर होणार होता , हि आम्हा सर्वासाठी धक्कादायक घटना होती . डॉक्टरांशी भेटून झाल्यावर मी ताबडतोब सुचित दादांना भेटायला गेलो . दादा म्हणाले , " काही PROBLEM नाही , करून टाका . जास्तीत जास्त हनुमान चालीसा बोला ." दादांच्या बोलण्याने धीर आला . नंतर खाली गुरुक्षेत्रम मध्ये येताच बापूंचे सुद्धा जवळून दर्शन झाले . सर्व शुभशकून सोबत घेऊन पुन्हा हॉस्पिटलला आलो . दुसऱ्या दिवशी म्हणजे २३/१२/२०१६ ला सकाळी ८ वाजता माझ्या वडिलाची  BYPAAS ची शस्त्रक्रिया चालू झाली आणि ती तब्बल दुपारी २ वाजेपर्यंत चालू होती . शस्त्रक्रिया यशस्वी झाली . वडील पुढील आठवड्याभरात सुस्थिर होऊन घरी आले  .ह्या सर्व कथेमध्ये बापूंनी जी साथ दिली  ती अशी  -

  आपण गुरुचरित्रामध्ये वाचतो ; त्यात सायंदेवाच्या घरी श्रीगुरु येतात आणि त्याला अपमृत्यु पासून अभय देतात . सायंदेव घरी परत येईस्तोवर थांबतात . तो सुखरूप परत आलेला पाहून मगच पुढील मार्गास जातात .
ओवी :
- वडिलांच्या हॉस्पिटल मध्ये ADMIT होण्यापासून शस्त्रक्रिया करेपर्यंतचा काल हा श्रीसच्चिदानंद उत्सवाचा होता ; म्हणजेच ह्या  संपूर्ण काळात बापू आमच्या सोबत होतेच .  शस्त्रक्रिया यशस्वी झाली तो दिवस पुनर्मिलापाचा होता .

माझे वडील जेव्हा त्यांना अस्वस्थ वाटु लागले तेव्हा OFFICE ला न जाता डॉक्टर कडे गेले हि बुद्धी बापुंनीच दिली .
अनिरुद्ध एव बुद्धिदाता ।जर त्या परीस्थितीत स्वतः DRIVE करत डॉक्टर कडे न जाता ते पुढे गेले असते तर , संकट फार मोठे होते . पण  बापू सोबत असताना कसली फिकीर !!

वडील ADMIT  होण्याच्या आदल्या दिवशी रात्री श्रीसच्चिदानंद उत्सवाचे DECORATION चा भाग म्हणून मी भिंतीवर ३ ओव्या PRINTOUT लावल्या . आणि त्याच ओव्या तंतोतंत सत्यात उतरल्या  .

त्या तीन ओव्या अशा होत्या :

१.                                         ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण I त्यासी कैंचे भय दारुण I 
काळमृत्यु न बाधे जाण I अपमृत्यु काय करी II

२.  अपघाते भय जाई टळे अकाल मरण । संकटात मदत होई मिळे मनाधार ।।
                अपघाते जरी हे चरण पाही । त्यासही रक्षी संकटी ।।

३. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय । स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय ।।
    आज्ञेविन काल हि ना नेई त्याला । परलोकी हि ना भीती तयाला ।।

ह्या ३ ओव्यांचा तंतोतंत आम्हाला प्रत्यय आला .

  खरच , हा बापू सर्व संकटांहून खूप खूप मोठा आहे . आपण आपल लहान लहान PROBLEMS कुरवाळत बसतो पण त्यापेक्षा बापूंना जवळ केले तर प्रोब्लेम्स कधी येणारच नाहीत . फक्त एकच सांगतो , " माझा बापू काहीही करू शकतो ."


।। हरी ॐ  । श्री राम । अंबज्ञ ।।




Saturday, June 27, 2015

पंचशील परीक्षा फ़ेब्रु. २०१५

पंचशील परीक्षा फ़ेब्रु. २०१५

पंचशीलची नावे  बापू declare  करू लागले आणि मी जाम excite झालो . नाव येईल असे वाटत सुद्धा होते . मग mobile मध्ये recording  चालू केले . oh ! आणि बापूनी नाव घेतले , "राहुल गुरव - राहुल गुरव " खूप excite  झालो . जवळच्या व्यक्तीला लगेच कळवले . आता उत्साह दादा कडून paper  घेण्याचा होता . आणि एक दिवस call  आला आणि २७ जुन सायंकाळी ५.३० ला बोलावणे आले . मी आणि आई तेथे पोचलो . number  येण्यास फार कालावधी होता . आजूबाजूच्या लोकांचे paper पाहून माझा paper तर फारच साधा आहे असे एक क्षण मनात येत होते पण लगेच "बापुना आवडलाय म्हणून तर distinction मिळालंय " असे मनात आले .  finally , दादाच्या cabin madhye मी आणि आई गेलो . दादांनी " हरिओम " म्हणून स्वागत केले . आणि आईकडे पाहून - हातात paper चाळत म्हणाले " paper छान लिहिलाय हा ह्याने , अम्बज्ञ " मी आणि आई " अम्बज्ञ" म्हणालो आणि मी दादा पुढे वाकलो , दादांनी माझ्या आणि आईच्या मस्तकवर  ठेवून आशीर्वाद दिला .
मला तो अभंग आठवतोय ," आला सहज हस्त तुझा , मस्तकावरी माझ्या …।"

दर्शन घेऊन निघालो , गुरुक्षेत्रम चे दर्शन सुद्धा घेतले ,आणि निघणार इतक्यात लोकांची चळवळ पाहिली  , समजलो बापू खाली आलेत ते ! बापू गाडीतून बाहेर जात होते , चालत्या गाडीतून बापूंचे सुंदर दर्शन झाले .


हरिओम श्री राम अम्बज्ञ

Wednesday, May 13, 2015

श्री श्वासम ; एक अभूतपूर्व आणि अद्वितीय सोहळा !

हरी ओम

माझा बापू माझ्यावर किती किती प्रेम करतो आणि त्या प्रेमाचे जिवंत उदाहरण म्हणजे श्री गुह्यसुक्तम !!
 आई आहेच , बापू हि आहेत परंतु माझ्या मनाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव नसते , तो आलाय हे माहित असून त्याचे महत्व आपल्याला कळत नाही आणि तेव्हा बापूमाउलीचे हृदय कळवळते आणि बापू आईच्या आज्ञेने  श्री गुह्यसुक्तम सर्व श्रद्धावानाना अर्पण करतात . माझ्या बापूचे मला मिळालेले हे सर्वोच्च गिफ्ट आहे.
  बापूंची तपचर्या संपली आणि बापूनी श्रीश्वासम ची घोषणा केली . परंतु नक्की काय ते कोणाला हि ठाऊक नव्हते . उत्सुकता तर अगदी शिगेला पोचली होती कारण दर गुरुवारी बापू ' हि श्री श्वासम ची तयारी आहे ' वगैरे बोलून उत्सूकता वाढवत होते . अखेर december २०१४ ला बापूंनी श्री श्वासम ४ में  ते १० में  २०१५ ला साजरा होणार हे सांगितले आणि सर्व श्रद्धावान आनंदित झाले , अरे , बापाने दिलेले GIFT  आहे आनंदित तर होणारच !
 मग सुरु झाली श्री श्वासम ची तयारी !! अगदी जोरात !
ज्याच्या त्याच्या तोंडी एकच उत्सुकता , श्री श्वासम -श्री श्वासम -श्री श्वासम  !
मी तर OFFICE मध्ये माझ्या सर्व SHIFT ADJUST करून घेतल्या . सर्व दिवस सेवेचा FORM हि भरून SUBMIT केला . दर वेळेला SSAUT ला सेवा मिळत असल्याने ह्यावेळेस हि तिथेच सेवा मिळेल असे वाटले होते परंतु बाप्पाची इच्छा ! ह्यावेळेस , WALKITALKI सेवा मला देण्यात आली . मी खूप खुश झालो . अम्बज्ञ देवा !!
   उत्सवाचा दिवस जसा जवळ येत होता , तशी प्रत्येक कार्यकर्ता नेमून दिलेली सेवा करत होता . उत्सवाच्या आदल्या दिवशी मी BADGE घेण्यासाठी LINK APARTMENT ला गेलो . माझी सेवा समजून घेतली . मी , अभिजीतसिंह आणि दीपकसिंह असे तिघे जण WALKITALKY सेवेला होतो . पाहता पाहता उत्सवाचा दिवस उजाडला . मी आदल्या दिवशीच माझे सर्व सामान घेऊन sion ला माझ्या मावशीकडे राहायला गेलो होतो . बापुकृपेने first day ला मला सुट्टी होती म्हणून लवकरच श्री हरीगुरुग्राम ला पोचलो . walkytalky  room  बापूंच्या room च्या वर second  floor  ला होता , त्यामुळे बापुना पाहण्याची काय धमाल वर्णू !! बापू आई दादा यापैकी कोणीही आले कि भक्तांचे " हरी ओम बापू , i love u  dad  " चे शब्द मोठ मोठ्याने कानावर यायचे मग आम्ही सर्व जण  धावत धावत grill  मध्ये जाउन उभे राहून सुंदर करुणामय बापुरायला पाहायचो . अनेकदा बापू दिसायचा नाही कारण  grill  च्या आत बापू असले कि दिसायचे नाहीत परंतु सर्व श्रद्धावानांच्या चेहऱ्यावर जो अप्रतिम भाव दाटून यायचा त्यात बापू दिसायचे .
काय वर्णू हा अनुपम्य सोहळा !! बाप्पाला पाहून अगदी नविन आलेला व्यक्ती हि आपोआप नतमस्तक होतो असे हे माझ्या देवाचे सुंदर रूप ! उत्सवाचे दिवस कसे निघून गेले समजलाच नाही . माझी morning  ला office  ला first  shift  तिथून sion  ला जाउन change  करायचो आणि मग लगेच तिथून श्री हरीगुरुग्राम गाठायचो . इतक्या धावत धावत करायचो पण सर्व बापूनी सांभाळून घेतले . माझ्या office  लाहि problem  होणार नही अशी सेवा मला दिली .
          हा उत्सव आई चा , आईच्या श्वासाचा ! खरच उत्सवात entry  मारल्याबरोबर प्रसन्न वातावरणाचा अनुभव यायचा . समोरच नाम लावणारे श्रद्धावान होते . तिथून पुचे आलो कि मुषक काढण्यासाठी हातात paper घेऊन उभे असलेले सेवेकरी असायचे . हा मुषक काढला कि आईची परडी ( सूप ) घेऊन प्रदक्षिणा मार्गाला सुरुवात करायची . प्रथम फोटो मुलार्क गणेशाचा , तिथे तो मुषकाचा photo अर्पण करून पुढे जायचे .मग दिसते ती अठरा हातांनी  बालांना  मिठीत  घेणारी मोठी आई ! पुढे दत्त बाप्पा ! पंचमुखी हनुमंत ! आणि त्यानंतर क्रमाने आईच्या विविध अवतारांचे photo , पण मुळात ते photo  नसून साक्षात आईच विविध  रूपात बसली होती . 

Tuesday, February 17, 2015

अपघाते चरण पाही , त्यासही रक्षी संकटी !

१७/०२/२०१५
रात्री चा प्रवास आणि तोही activa वरून ! सर्व जग झोपत होते आणि मी माझ्या घराच्या दिशेने activa  भरवेगात मारत होतो . bike  start  करताच बापूंना  prayer  केली कि तुम्ही सोबत राहा . रात्री ११:५५ ला डोंबिवली वरून निघालो आणि activa  भर वेगात चालवू लागलो . ताबडतोब जप चालू केला . गुरुमंत्र मुखात होता . वातावरणात प्रचंड थंडी होती . रस्ता सुमसान होता . साधे कुत्र हि नव्हते  . आजूबाजूने भरधाव वेगात truck  जात होते . मी activa  ६० kmph ने drive  करत होतो . मध्येमध्ये येणारे speedbreakers मुळे  त्रास होत होता पण कधी घरी पोचतो असे होत होते . बापू गाडी बंद पडू नको , हीच prayer  करत होतो .
   रस्ता पार करत करत मुंब्रा घाट  उतरत असताना मी आदिमाता स्तवन चालू केले . पुढे येणाऱ्या संकटाची मला जाणीव हि नव्हती . मी जोर जोरात स्तवनं म्हणताच होतो . आता घात उतरून highway  लागणार होता . समोरचा प्रकाशमय रस्ता दिसतही होता पण घाटावर lights नव्हते . माझी ६०kmph  activa  fast  fast  घाट  उतरत होती . अंधारामुळे मला घाटाच्या शेवटी जिथे तो रस्ता highway  ला joint  होत होता तिथला speedbreaker  दिसला नाही . आणि माझी भरधाव वेगातली activa  त्या उतारावरून , अंधारामध्ये , ६० kmph  च्या speed  मध्ये त्या speedbrekar वरून जवळ जवळ ३-३.५ फूट वर उडाली . मी जोरात ' om  namchandikaye ' म्हणालो , कारण स्तवन चालू होते मुखामध्ये ! गाडी जी उडाली ति धप्प करून रस्त्यावर आदळली . पण माझा balance  बापुंनी  सांभाळला  . आणि माझी न गाडी पडली न मी स्वतः !
अम्बज्ञ बापुराया ! तू सोबत होतास म्हणून भयाण संकटातून वाचवलेस . नाहीतर  रात्री १ वाजता कोण असते त्या highway  वर !
अम्बज्ञ बापुराया !
अम्बज्ञ बापुराया !