Tuesday, February 17, 2015

अपघाते चरण पाही , त्यासही रक्षी संकटी !

१७/०२/२०१५
रात्री चा प्रवास आणि तोही activa वरून ! सर्व जग झोपत होते आणि मी माझ्या घराच्या दिशेने activa  भरवेगात मारत होतो . bike  start  करताच बापूंना  prayer  केली कि तुम्ही सोबत राहा . रात्री ११:५५ ला डोंबिवली वरून निघालो आणि activa  भर वेगात चालवू लागलो . ताबडतोब जप चालू केला . गुरुमंत्र मुखात होता . वातावरणात प्रचंड थंडी होती . रस्ता सुमसान होता . साधे कुत्र हि नव्हते  . आजूबाजूने भरधाव वेगात truck  जात होते . मी activa  ६० kmph ने drive  करत होतो . मध्येमध्ये येणारे speedbreakers मुळे  त्रास होत होता पण कधी घरी पोचतो असे होत होते . बापू गाडी बंद पडू नको , हीच prayer  करत होतो .
   रस्ता पार करत करत मुंब्रा घाट  उतरत असताना मी आदिमाता स्तवन चालू केले . पुढे येणाऱ्या संकटाची मला जाणीव हि नव्हती . मी जोर जोरात स्तवनं म्हणताच होतो . आता घात उतरून highway  लागणार होता . समोरचा प्रकाशमय रस्ता दिसतही होता पण घाटावर lights नव्हते . माझी ६०kmph  activa  fast  fast  घाट  उतरत होती . अंधारामुळे मला घाटाच्या शेवटी जिथे तो रस्ता highway  ला joint  होत होता तिथला speedbreaker  दिसला नाही . आणि माझी भरधाव वेगातली activa  त्या उतारावरून , अंधारामध्ये , ६० kmph  च्या speed  मध्ये त्या speedbrekar वरून जवळ जवळ ३-३.५ फूट वर उडाली . मी जोरात ' om  namchandikaye ' म्हणालो , कारण स्तवन चालू होते मुखामध्ये ! गाडी जी उडाली ति धप्प करून रस्त्यावर आदळली . पण माझा balance  बापुंनी  सांभाळला  . आणि माझी न गाडी पडली न मी स्वतः !
अम्बज्ञ बापुराया ! तू सोबत होतास म्हणून भयाण संकटातून वाचवलेस . नाहीतर  रात्री १ वाजता कोण असते त्या highway  वर !
अम्बज्ञ बापुराया !
अम्बज्ञ बापुराया !

Sunday, February 15, 2015

मार्ग दाविती सुचीतदादा - 1

हरी ओम

मार्ग दाविती सुचीतदादा

खरच , आपण कोणत्या तरी बिकट प्रश्नामध्ये अडकून बसतो आणि आपल्याला मार्ग सापडत नही , अशावेळेस दादा जो उपाय सांगतात जो मार्ग दावितात तो उचित असतोच . त्यातून आपले हित साधणारच असते .

असाच माझा प्रश्न घेऊन मी दादा कडे गेलो . ह्या वेळेस मला जे काही सांगायचे होते ते मी एका paper  वर लिहून तो paper दादा च्या हातात दिला . दादा नि अतिशय गंभीरतेने तोpaper  वाचला आणि म्हणाले ," हे बघ मी ह्या बाबतीत काही निर्णय देऊ शकत नही पण मी तुला उपासना  देतो . रोज हनुमान चालीसा , अनिरुद्ध चालीसा आणि दत्त बावनी करायची . आणि एक लक्षात ठेव नेहमी स्वताचा विचार आधी कर . मग आई बाबांचा ! दुसर्याला काय वाटेल ह्याचा अजिबात  विचार करू नकोस . आधी स्वताचा विचार कर . आणि बोल काय म्हणतोस …. मी म्हणलो । दादा ,  तुम्ही दिलेल्या उपासनेमुळे मोनोराइल चा जॉब  हि चालू आहे …। दादा म्हणले हो मला सर्व माहित आहे . पण आधी स्वताचा विचार कर .

दादा चे हे आश्वासक शब्द खूप महत्वाचे होते . मला माझ्या प्रश्नाचे उत्तर एका वाक्य त्यांनी दिले ।

अम्बज्ञ